
वृत्तसंस्था
हैदराबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी न मारलेल्या कानाखालीचा आवाज महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असतानाच तेलंगणमध्ये नवीन “नारायण राणे” उदयाला आले आहेत…!! TRS Min Malla Reddy challenged Telangana Cong chief Revanth Reddy for a face-off; abused him & used aggressive body language during a meeting y’day, saying “Let’s contest face to face. If you win, I’ll quit politics. If you’ve guts, you win”
तेलंगणमधले चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीचे नेते आणि मंत्री मल्ला रेड्डी हे नारायण राणे यांच्या पुढे गेले आहेत. नारायण राणे नुसते कानाखाली आवाज काढला असता असे म्हणाले… पण मल्ला रेड्डी यांनी आपल्या नावाला शोभतील असे हातवारे करून आणि मांडी – शड्डू ठोकून काँग्रेसला आव्हान दिले आहे.
#WATCH | TRS Min Malla Reddy challenged Telangana Cong chief Revanth Reddy for a face-off; abused him & used aggressive body language during a meeting y'day, saying "Let's contest face to face. If you win, I'll quit politics. If you've guts, you win"
(Warning: Abusive Language) pic.twitter.com/mVA1bxX5Xe
— ANI (@ANI) August 26, 2021
एका कार्यक्रमात बोलताना मल्ला रेड्डी एवढे चिडले की त्यांनी भर स्टेजवर त्यांनी भाषण करता करता मांडी ठोकली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवणनाथ रेड्डी यांना समोरासमोर येऊन निवडणूक लढवून दाखविण्याचे आव्हान दिले. ते एवढेच करून थांबले नाहीत, तर त्यांनी शड्डू ठोकून रेवणनाथ रेड्डी यांना भरपूर शिव्या देऊन घेतल्या. शड्डू ठोकून काँग्रेसला संपविण्याची भाषा केली. हिंमत असेल तर समोर येऊन लढून दाखवा असे म्हणाले. जर मी तुमच्या विरोधात निवडणूक हरलो, तर नुसता मंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, तर राजकारण सोडून देईन, असे मल्ला रेड्डी तावातावात म्हणून मोकळे झाले.
त्यांनी भाषणाच्या ओघात रेवणनाथ रेड्डी आणि काँग्रेस पक्ष यांच्या नावाने भरपूर शिव्या मोजल्या. त्यांच्या या आवेशपूर्ण भाषणाने स्टेजवरचे नेते हबकून बघतच राहिले. पण त्यानंतर त्यांच्यावर काही कारवाई झाली की नाही, याची बातमी अजून आलेली नाही. काँग्रेस त्यांच्या भाषणावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त करते याचीही वाट पाहिली जात आहे.