विशेष प्रतिनिधी
मुंबई – मॉनिटायझेशन म्हणजे नेमके काय हेच राहुल गांधी यांना कळत नाही. या धोरणांतर्गत आम्ही कोणतीही संपत्ती विकत नाही. त्याचा ताबा पुन्हा सरकारकडेच येईल. याउलट काँग्रेसनेच हवा, पाणी, जमीन, खाणी विकल्या. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवेळीही असेच लोणी खाल्ले अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. Nirmala sitarman targets congress leadership
त्या म्हणाल्या, सरकारी मालमत्तेतून पैसा मिळविण्याच्या उपक्रमाची (मॉनिटायझेशन) सुरुवात काँग्रेसने केली व त्यापोटी त्यांना भरपूर ‘मोबदला’ही मिळाला; मात्र २०१४ पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर लाचखोरीचा एकदाही आरोप झाला नाही. अशा सरकारी मालमत्तांमधून पैसे मिळविल्याने त्यांची मालकी खासगी व्यक्तींकडे जाणार नाही.
त्या म्हणाल्या, की काँग्रेसच्या राजवटीत सन २००८ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचे हक्क देऊन पैसे मिळविण्यासाठी खासगी व्यक्तींकडून प्रस्ताव (आरएफपी) मागविण्यात आले. तेव्हा पंतप्रधान, अर्थमंत्री हे काँग्रेसचेच होते. राहुल गांधी यांनी पसंत नसलेला वटहुकूम पत्रकारांसमोर फाडून टाकला. ते सरकारी संपत्तीपासून पैसे मिळविण्याच्या विरोधात होते; तर त्यांनी हा आरएफपी का फाडला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App