विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दुसऱ्याच दिवशी राजकीय हंगामा करून ठाकरे – पवार सरकारने अटक केली, पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच वादग्रस्त वक्तव्ये एकापाठोपाठ एक सोशल मीडिया वरून शेअर केली जात आहेत. Uddhav Thackeray also made derogatory remarks against Yogi Adityanath
असेच एक वादग्रस्त वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात केले होते. 2018 मध्ये पालघरच्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना चप्पलने मारू, असे वक्तव्य केले होते.
योगी आदित्यनाथ यांनी एका जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला होता. त्यावेळी त्यांच्या पायात खडावा होत्या असे बोलले गेले. परंतु त्याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना चप्पलने मारण्याची भाषा वापरली होती.
त्यावर योगी आदित्यनाथ यांनी त्यावेळी प्रतिक्रियाही व्यक्त केली होती. ते म्हणाले की, होते की उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मी अधिक सभ्य आहे. श्रद्धांजली कशी अर्पण करायची हे मला चांगले माहिती आहे. त्यांच्याकडून काही शिकण्याची मला गरज नाही.
आज शिवसेना आणि भाजप यांच्यात जेवढे राजकीय वैर उफाळून आले आहे, त्यापेक्षा कमी वैर 2018 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये होते. शिवसेना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील होती. शिवसेनेचे नेते फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्या त्यावेळच्या वादग्रस्त वक्तव्याचा नेटिझन्स सोशल मीडियावरून जोरदार समाचार घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App