विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – ‘गुपकार’ गटाची बैठक आज येथे होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीररमधील सध्याच्या स्थितीवर त्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे, तसेच पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीारला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा देण्यात यावा व ऑगस्ट २०१९पूर्वीची स्थिती कायम ठेवण्यात यावी, अशी प्रमुख मागणी ‘गुपकार’ गटाची आहे. Gupkar will meet today to discuss Kashmir issue
या गटामध्ये सहा राजकीय पक्षांचा समावेश आहे. गुपकार गटाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. ‘‘संबंधित पक्षांच्या प्रमुखांसह मधल्या फळीतील नेत्यांनाही या बैठकीला बोलावण्यात आले आहे. आधीपेक्षा ही बैठक वेगळी असेल,’’ असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. बैठकीला कोणकोणत्या नेत्यांना पाठवायचे आहे, याचा निर्णय संबंधित पक्ष घेतील, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
‘गुपकार’ गटाच्या बैठकीला १५० ते २०० जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बैठक आधीच घेण्याची इच्छा होती. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नाही, आता तशी बैठक होत आहे. सर्व नेत्यांची मते ऐकून घेऊन, नंतर दिशा ठरविली जाईल, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App