विशेष प्रतिनिधी
उस्मानाबाद : दुधातील भेसळ व त्याचे आरोग्यावरील दुषपरिणाम पाहता उस्मानाबाद येथील दहा सुशिक्षित मित्रांनी गीर गाई खरेदी करून दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. विशेष म्हणजे त्यांचा व्यवसाय नावारुपास येऊ लागला आहे. Ten Educated Friends founded Dairy; Purchased Gir cow and delivering Milk to local people
सुरुवातीला पाच गीर गायीपासून सुरु केलेला व्यवसाय आता ६० गायीपर्यंत येऊन पोचला आहे. दररोज सकाळी ५० ते ६० लिटर शुध्द दुध सभासदांना घरपोच दिले जात आहे. शेण आणि गोमुत्रापासूनही उत्पादन घेतले जात आहे. खर्च व उत्पन्न लक्षात घेता जास्त नफा मिळत नसला तरी किमान सर्व सभासदांना स्वच्छ दुध मिळत असल्याचे संजय चव्हाण यांनी सांगितले. गीर गाईचे पोषक व शुध्द दुध ८० रूपये लिटरप्रमाणे विकले जात असून शुद्ध तुपालाही चांगली मागणी वाढत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App