विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत काल रात्रीपासून तब्बल १३९ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. १९६१ नंतर एका रात्रीत झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. Delhi records highest rain since 1961
काल रात्रीपासून दिल्ली-परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरवात झाली. आज सकाळी ९-१० पर्यंत अखंड पाऊस कोसळत होता. दिल्लीत आज सकाळी ८.३० पर्यंत १३८.८ मिलीमीटरहून जास्त पावसाची नोंद झाली. १९६१ नंतर दिल्लीत प्रथमच काही तासांत इतका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
यामुळे रस्त्यांचे तलावांत रूपांतर होऊन वाहनचालकांचे अतोनात हाल झाले व भीषण वाहतूक कोंडीत कार्यालयांत पोहोचण्याच्या घाईत असलेले हजारो दिल्लीकर अडकून पडले. जेथे जेथे पुलाखालून रस्ते गेले आहेत तेथे पाणी साचले. आयटीओ, मंडी हाऊस, प्रगती मैदान, मिंटो ब्रीज, राजघाट, निगमबोध घाट यासह लाजपतनगर, दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली, लक्ष्मीनगर ,आनंद विहार आदी अनेक ठिकाणी रस्ते व पदपथही पाण्याखाली गेले. रेल्वेस्थानक, बसस्थानके पाण्याने भरून गेले. रस्ते व पदपथ कोठे आहेत हे कळेनासे झाले. गुडघ्यापर्यंत पाणी साचलेल्या रस्त्यांत अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली.
Delhi records highest rain since 1961
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App