विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर तालिबानने महिलांना सत्तेत सहभागी होण्याचे निमंत्रण देत त्यांच्या हक्कांचा आदर केला जाईल, सुरक्षित व शांततापूर्ण वातावरणाची हमी दिली होती. मात्र प्रत्यक्षात वेगळेच चित्र असल्याचे काबूलमधील छायाचित्र व व्हिडिओतून समोर आले आहे. Talibani peoples beaten women
अफगाणिस्तान सोडण्यासाठी विमानतळावर आलोल्या महिला व मुलांना अणकुचीदार शस्त्रांनी मारत असल्याची काही छायाचित्रे व व्हिडिओ ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ या वृत्तपत्राचे पत्रकार मार्कस याम यांनी बुधवारी ट्विटरवर पोस्ट केली आहेत. या घटनेत एक महिला व मुलासह अनेक जण जखमी झाल्याचा दावा मार्कस यांनी केला आहे.
‘फॉक्स न्यूज’कडे आलेल्या एका व्हिडिओत तालिबान्यांकडून मारहाण होत असल्याचा दावा केला आहे. काबूलमधील रस्ते व अन्य ठिकाणी तालिबानी फिरत असल्याचे असल्याचे व माजी सरकारी कर्मचाऱ्याला पाहिल्यावर त्याच्यावर गोळीबार करीत असल्याचेही दिसत आहे.
तकहार प्रांतात सार्वजनिक स्थळी डोके न झाकल्याने एका महिलेला तालिबान्यांनी ठार केल्याचे वृत्त या वाहिनेने दिले होते.
फरयाब प्रांतात जुलैमध्ये एका महिलेला मारहाण केल्याचा वृत्तांत ‘सीएनएन’ने दिला आहे. दुगर्म खेड्यात राहणाऱ्या नाजियाच्या घरात प्रवेश करून तालिबान्यांनी तिला १५ जणांसाठी स्वयंपाक करण्याचा आदेश तिला दिला. नाजियाने गरीब असल्याचे सांगून स्वयंपाक बनविण्यास असमर्थतता दर्शविली. त्या नंतर त्यांनी तिला एके-४७ रायफलने मारहाण केली, घरातील एका खोलीत ग्रेनेड फेकला आणि आग लागल्यानंतर ते पळून गेले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App