कोरोनाने सध्या जगभरातील शास्त्रज्ञांपुढे आव्हान उभे केले आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी साथींची पूर्वसूचना देणारी कोणतीही व्यवस्था सध्या तरी नाही. ती विकसित करण्यावर आता भर दिला जात आहे. डुक्कर हे जवळजवळ सर्वच शीतज्वराच्या विषाणूंचे घर असल्याचे मानले जाते. त्यांच्या कळपावर योग्य देखरेख ठेवल्यास आणि त्यांची वेळोवेळी तपासणी केल्यास भविष्यात मानवी वस्तीत शिरकाव करणाऱ्या वैश्विेक साथीचा अंदाज येऊ शकतो असा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. डुकरांच्या देखरेखीतून वैश्वि क साथीची अशा प्रकारे पूर्वसूचना मिळाली, तर प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेळीच गती देता येईल. पण त्याचबरोबर लस आणि औषधासंबंधीच्या संशोधनालाही वेळेआधीच सुरुवात करता येईल. पर्यायाने साथ पसरल्यानंतर अल्पावधीतच लस उपलब्ध होऊन आजच्यासारखी आणीबाणीची स्थिती निर्माण होणार नाही. स्वाईन फ्ल्यूमुळे प्रकर्षाने ही बाब लक्षात आली. Now a pig will give a warning to human beings about the outbreak of diseases
1957 आणि 1968 मध्येही डुकरांच्या माध्यमातून अशी साथ पसरली होती. 2011 ते 2018 दरम्यान शास्त्रज्ञांनी डुकरांच्या कळपाची सातत्याने तपासणी केली. त्यावरून सध्या जीनोम टाईप-4 प्रकारातील विषाणू माणसांसाठी जास्त हानिकारक ठरू शकतात, असे स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांनी सुमारे 29 हजार डुकरांची या संशोधनासाठी निवड केली होती. प्राथमिक अभ्यासातून 2013 नंतर डुकरांमधील आनुवंशिक विविधता झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले. या डुकरांमध्ये 136 प्रकारचे शीतज्वराचे विषाणू आढळले. शीतज्वराला कारणीभूत ठरणाऱ्या एच1 एन1, सार्स आदी विषाणूंचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. डुकरांमध्ये संसर्गजन्य आजार पसरला, तरी त्याचा माणसांमध्ये शिरकाव होण्यासाठी कोणते जनुकीय बदल अपेक्षित आहेत, त्याचा प्रादुर्भावाचा वेग काय असेल, यासंबंधीचे संख्याशास्त्रीय विश्ले षण त्यांनी केले. येत्या काळात जी-4 ईए एच1एन1 हा विषाणू माणसांमध्ये संक्रमित होण्याची दाट शक्य ता आहे. त्यामुळे तातडीने डुकरांवर देखरेख ठेवून योग्य उपाययोजना केल्यास ही साथ रोखता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App