वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात एकाच दिवसात म्हणजे सोमवारी (ता. १६) कोरोना विरोधी लसीचे ८८ लाख डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंतचा हा विक्रम असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. India achieves the highest single-day record in #COVID19 vaccine 88 lakh doses
कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशात लसीकरण वेगाने करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी एकाच दिवसात ८८ लाख डोस नागरिकांना देण्यात आले. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मानसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली.
लसीकरण मोहिमेतील हा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल मांडविया यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच लसीकरण करून घेणाऱ्या भारतीयांचे अभिनंदन केले आहे. कारण कोरोनाला रोखण्यासाठी लस हा उत्तम पर्याय सध्या देशासमोर आहे.
संभाव्य संक्रमण आणि तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीकरणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसरी लाट येण्यापूर्वीच कोरोनाचा खात्मा करण्याची अपूर्व अशी संधी मिळाली आहे. युद्धापूर्वीच तयारी केली तर आपण युद्ध जिंकू शकतो. त्यामुळे शांततेच्या काळात भारतवासीयांनी लसीकरणासाठी पुढाकार घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App