आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा’ असेच चित्र सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे आहे.
शिवसेनेचे मुख्यमंत्री बाबा उद्धव ठाकरे कोरोनाचे नियम घालतात मात्र बाळ्या युवासेनेचे आदित्य ठाकरे वारंवार हे नियम मोडतात .
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार जनतेला कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले .अजुनही सामान्य जनतेवर अनेक निर्बंध आहेत .दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे कोरोना नियमांचे वारंवार उल्लघंन करताना दिसत आहेत .आधी बीडमध्ये युवासेनेने धडाकेबाज कार्यक्रम घेतला आता तुफान गर्दी करत औरंगाबादेत नियमांना तिलांजली वाहण्यात आली. Aurangabad: Adityasena’s huge crowd! Violation of CM’s rules in Aurangabad after Beed; Will there be action?
युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी (13 ऑगस्ट) रोजी तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी बीडलादेखील अशाच प्रकारे गर्दी झाली होती. कार्यक्रमात गर्दी झाली तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असे सरदेसाई यांनीच यापूर्वी म्हटलं होतं.
शिवसेनेतर्फे युवा संवादाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जातोय. या संवादाची पुण्यातून सुरुवात झाली. आता मराठवाड्यातसुद्धा अशाच पद्धतीने युवा संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यावेळी औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच येथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला.
कार्यक्रमात गर्दी झाल्यास आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला तरी आमची हरकत नसेल, असे वक्तव्य सरदेसाई यांनी केले होते. तसेच कार्यक्रमात कोणतीही गर्दी होऊ देणार नाही अशी हमी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच येथे कोरोना नियमांचे लल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व प्रकारानंतर आता पोलीस प्रशासन कायद्याप्रमाणे कारवाई करणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App