चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानाच्या परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधानांकडून होत आहे. व्यावसायिकांना जगविण्यासाठी त्यांना भाड्यासाठी त्रास देऊ नका असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी दिशादर्शक म्हणनू केंद्र सरकारने भारतीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पर्कामधील आयटी युनीटचे चार महिन्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानाच्या परिस्थितीत एकमेंकांना सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधानांकडून होत आहे. व्यावसायिकांना जगविण्यासाठी त्यांना भाड्यासाठी त्रास देऊ नका असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी दिशादर्शक म्हणनू केंद्र सरकारने भारतीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पर्कामधील आयटी युनीटचे चार महिन्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीपीआय ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अनेक छोटे आयटी युनिट्स आहेत. यापैकी बहुतांश युनिट्स हे टेक एसएसएमईएस किंवा स्टार्ट अप्स आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 1 मार्च 2020 ते 30 जून 2020 पर्यंत अर्थात 4 महिन्यांच्या कालावधीसाठी एसटीपीआय आवारात असलेल्या या युनिट्सना भाडे माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या युनीटवर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांनाही त्याचा फायदा होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App