बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांची रुग्ण संख्या वाढते आहे. अशातच या मेळाव्याचे आयोजन होत असल्याने, गर्दी करून कोरोनास निमंत्रण दिलं जातंय का.?
विशेष प्रतिनिधी
बीड: कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या बीडमध्ये शिवसेनेच्या युवा संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं . जिथं कोरोनाचे निर्बंध अद्याप कडक आहेत, अशा बीडमध्ये शिवसेनेनेच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले .दुसरीकडे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी नसतांना नाट्यगृहातचं शिवसेनेकडून धडाकेबाज कार्यक्रम घेण्यात आला .या संवाद दौऱ्याला हजारो युवा सैनिकांची उपस्थिती लावली होती.Corona Hotspot Beed: Aditya Thackeray’s Yuva Sena launches closed theater and breaks CM’s corona rules
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत, मास्क न लावता हजर राहिल्यामुळे कोरोना बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाचं आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. सत्ताधारी शिवसेनेला नियम नाहीत का ?
युवासेना सचिव वरून सरदेसाई मराठवाड्याच्या संवाद दौर्यावर आहेत. आज त्यांचा दौरा बीडमध्ये होता, दरम्यान यावेळी सरदेसाई यांनी सेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून नाट्यगृह, सिनेमागृह, धार्मिक स्थळ आणि सामूहिक कार्यक्रमास बंदी असताना मात्र, युवा सेनेकडून शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कोरोना नियमांचा फज्जा उडवत संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
या कार्यक्रमासंदर्भात सचिव वरून सर्देसाई यांना विचारले असता हाच नियम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदींना का लावला नाही तो लावला असता तर दुसरी लाट आली नसती, निवडक कार्यकर्ते घेऊन हा मेळावा होत आहे असं ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App