वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 15 ऑगस्ट रोजी भारताचा 75वा स्वतंत्र दिन साजरा होत आहे .त्यामूळे दिल्लीपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. एवढंच नाही तर गुप्तचर संघटनांना देखील सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. जैश आणि लष्कर संघटनेचे दहशतवदी हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने दिल्ली पोलीस, जीआरपी, लोकल पोलिसांना सतर्क राहण्यासाठी सांगितलं आहे. High Alert: Terrorists plot to attack this place on 15th August; Warning intelligence agencies to be vigilant; Alert issued
महत्त्वाची सुरक्षा प्रतिष्ठाने दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. सुरक्षा दलाचे फॉरवर्ड पोस्ट आणि जवान दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. अलर्टमध्ये असे म्हटले आहे की, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे ज्याने भारतात शस्त्रे आणि आयईडी पाठवले आहेत. याबद्दल सर्व सुरक्षा दलांना विशेष चेतावणी देण्यात आली आहे.
कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्याची काळजीपूर्वक तपासणी करा आणि ते निष्क्रिय करताना खबरदारी बाळगण्याची सुचना देखील देण्यात आली आहे. त्यामुळे मेटल डिटेक्टरवर तैनात असणाऱ्या पोलिसांनीही विशेष काळजी घ्यावी आणि योग्य ती तपासणी करावी. असं देखील सांगण्याच आलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे, 6 दहशतवादी कमांडर मोहम्मद सादिक यांच्या नेतृत्वाखाली POK मधील पोटल नावाच्या लाँचिंग पॅडवर सज्ज आहेत. तर जैश ए मोहम्मदचे 5 दहशतवादी POK मधील तदोते लाँचिंग पॅडवर तैनात आहेत. तर काही दहशतवादी घुसखोरीकरून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडविण्याच्या तयारीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App