दुध हे पौष्टिक अन्न म्हणून ओळखले जाते. दुधाचे सेवन शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक मानले जाते. खर तर दूध ह पूर्ण अन्नच मानले जाते. मात्र अलीकडच्या काळात दुधात भेसळ होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सुट्या दुधात तर भेसळ करणे सहज शक्य असते. त्यामुळे अनेक जण पिशवीतील दूध घेण्यास प्राधान्य देतात. प्रामुख्याने शहरात आपल्यापर्यंत पाकिटांद्वारे दूध येतं मात्र त्यातही भेसळ होण्याची शक्यता असते. दुधात पाण्याची, स्टार्च, डिर्टजट पावडर, साखर, इ.ची भेसळ केली जाते. आरोग्यासाठी हे फार धोकायदायक मानले जाते. भेसळयुक्त दुधामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. ही भेसळ घरच्या घरी ओळखता आली तर किती बरे होईल. यासाठी विज्ञान तुम्हाला चांगली मदत करते. घरच्या घरी भेसळ ओळखायची असेल तर एखाद्या स्वच्छ पृष्ठभागावरून दुधाचे थेंब घसरू द्यावेत जर पांढरट डाग राहिले तर ते दूध शुद्ध असते. The secret of science: How to recognize adulteration of milk at home
थोडय़ा दुधात पाणी घेऊन जोराने हलवले असता फेस आला तर त्यात डिटर्जंट पावडरची भेसळ असू शकते आणि ते स्पर्शालादेखील गुळगळीत लागते. असे भेसळयुक्त दूध हे तापवल्यावर पिवसळर होते. दुधात स्टार्चची भेसळ करून काबोर्दके वाढवली जातात. ही भेसळ ओळखण्यासाठी मेडिकलच्या दुकानात मिळणाऱ्या आयोडिनचा थेंब टाकला असता दूध निळसर होते. अशी भेसळ कोणी करू नये म्हणून दुधाच्या पिशवीतून दूध पातेल्यात सोडताना पिशवीला मोठा तिरकस काप द्यवा जेणेकरून दुधाच्या पिशवीचा भेसळीसाठी उपयोग होऊ शकणार नाही व पिशवी धुऊन सिंकच्या टाइल्स वर उलटी चिकटवावी. पाण्याने ती सहज चिकटते. म्हणजे पिशवी आतून स्वच्छ होते व तिचा आतून घाण वास येत नाही व कचऱ्याच्या डब्यात ती न टाकता भंगारवाल्याला दिली तर त्याची योग्य विल्हेवाट लागते व पर्यावरणाचे जतनदेखील आपण करू शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App