विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – पंतप्रधान इम्रान खान हे आतापर्यंतचे सर्वांत असहाय्य पंतप्रधान असून पाकिस्तानात पत्रकारांसाठी भयाचे वातावरण निर्माण होत आहे, अशी टीका वरीष्ठ पत्रकार हमीद मीर यांनी केली आहे. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीतदरम्यान हमीद मीर म्हणाले पाकिस्तानमध्ये माध्यम स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. देशात लोकशाही केवळ नावालाच शिल्लक आहे,’ असे ते म्हणाले. Journalist Hamid Mir targets Pak PM
‘टॉक शो’मधून काढून टाकण्यास इम्रान खान हे थेटपणे जबाबदार असतील असे मला वाटत नाही. पूर्वीच्या अनेक पंतप्रधानांप्रमाणेच ते असहाय्य असून मला कोणतीही मदत करू शकत नाहीत. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे देशातील गुप्तचर संस्थांचाच हात आहे.
थेट प्रक्षेपण सुरु असलेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार टीका केल्यानंतर मीर यांना कॅमेरासमोर येण्यास नुकतीच मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील पत्रकार असाद अली तूर याच्यावर इस्लामाबादमध्ये तीन जणांनी हल्ला केला होता.
त्याचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हमीद मीर यांनी पाकिस्तानी सैन्यावर जोरदार टीका केली होती. यामुळे जिओ वाहिनीवरील त्यांच्या प्रसिद्ध टॉक शोमधून त्यांना दूर करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App