COVID CERTIFICATE : प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का? ‘प्रमाणपत्र WHO च्या निर्देशानुसारच’ कुमार केतकरांच्या प्रश्नाला भारती पवारांचे उत्तर …

लोकांपर्यंत असे महत्त्वाचे संदेश सर्वात प्रभावी पद्धतीने पोहोचवणे ही सरकारची नैतिक आणि धोरणात्मक जबाबदारी आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोना लस घेतल्यानंतर मिळालेल्या लस प्रमाणपत्रावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो फोटो आहे त्यावर विरोधकांच्या वतीने सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यसभेत आरोग्य मंत्रालयाने प्रमाणपत्रावर पीएम मोदींचा फोटो का लावण्यात आला आहे याचे नेमके स्पष्टीकरण दिले आहे.COVID CERTIFICATE: Why Modi’s photo on certificate? ‘Certificate as per WHO instructions’ Bharti Pawar’s answer to Kumar Ketkar’s question …

आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी राज्यसभेत सांगितले की, कोव्हिड-19 (Covid-19) चे योग्य वर्तनाचे (appropriate behavior) पालन करणे हा या रोगाचा प्रसार रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तसेच लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींच्या संदेशासह फोटो असल्याने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास अधिक मदत करते.

मोदींच्या फोटोसह संदेश –

प्रमाणपत्रावर क्यूआर कोडसह पंतप्रधान मोदींचा फोटो देखील छापण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या फोटोच्या समोर त्यांच्या भाषणातील एक वाक्य देखील छापण्यात आलं आहे.दवाई भी और कडाई भी म्हणजे ‘औषध सुद्धा आणि शिस्त सुद्धा… एकत्रितपणे भारत कोविड -19 ला हरवेल.’

याच वाक्याद्वारे आणि पंतप्रधान मोदींच्या फोटोमुळे लोकांमध्ये लसीविषयी जागरुकता निर्माण होईल.

‘प्रमाणपत्र WHO च्या निर्देशानुसारच’-

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, ‘कोव्हिड-19 लसीकरण प्रमाणपत्रांचे स्वरूप प्रमाणित आहे आणि प्रमाणपत्रांवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे.’

काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी सरकारला प्रश्न विचारला होता की, लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापणे आवश्यक आणि अनिवार्य आहे का?

ज्यावर उत्तर देताना मंत्री भारती पवार म्हणाल्या की, ‘साथीच्या रोगाचे बदलते स्वरूप पाहता योग्य कोव्हिडसंबंधी योग्य वर्तनाचे पालन करणं हा रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणून उदयास आला आहे. लसीकरण प्रमाणपत्रांमध्ये पंतप्रधानांच्या संदेशासह फोटो हा व्यापक जनहितासाठी छापण्यात आला आहे.’

‘लस घेतल्यानंतर देखील कोरोनासंबंधी योग्य नियम पाळणं गरजेचं आहे आणि त्याचसंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी संदेश आणि फोटो छापण्यात आला आहे.’

 

COVID CERTIFICATE: Why Modi’s photo on certificate? ‘Certificate as per WHO instructions’
Bharti Pawar’s answer to Kumar Ketkar’s question …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात