AIRLIFT : मोदी सरकारचा मोठा निर्णय ! अफगान बनलं युद्धभूमी – भारतीयांना करणार ‘एअरलिफ्ट’ ; मजार-ए-शरीफहून दिल्लीसाठी उडालं स्पेशल विमान

  • अफगानिस्तानात तालिबान दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. आता इतर महत्वाच्या शहरांवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी आपला मोर्चा अफगानिस्तानातलं सर्वात मोठं शहर असलेल्या मजार ए शरीफकडे वळवला आहे.

वृत्तसंस्था

काबुल : अफगाणिस्तान सैन्य आणि तालिबान यांच्यात मोठ्या प्रमाणात  युद्ध  होत असताना, भारत सरकारने मजार-ए-शरीफ आणि त्याच्या आसपास असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे .मजार-ए-शरीफ ते दिल्लीसाठी एक विशेष फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली .AIRLIFT : IAF to evacuate Indian citizens from Afghanistan’s Mazar-e-Sharif amid Taliban attacks

अफगानिस्तानात मागच्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना पुन्हा सुरक्षित मायदेशी परत घेऊन येण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

यादरम्यान, मंगळवारी (10 ऑगस्टला) उत्तर अफगानिस्तानात असलेल्या मजार ए शरीफ (Majar e Sharif) शहरातून दिल्लीसाठी एक विशेष विमान निघालं. या विमानात मजार ए शरीफ आणि परिसरात राहणारे भारतीय नागरिकांना पुन्हा भारतात एअरलिफ्ट (Airlift) केलं जातं आहे. मजार ए शरीफमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली आहे

मागच्या काही दिवसांत तालिबान (Taliban) आणि अफगान सैन्यादरम्यान युद्ध सुरू आहे. त्यामुळे अफगानिस्तानात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अमेरिकी सैन्यानं माघारी जाण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानने अधिक आक्रमक रुप धारण केलं. अफगानिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रोज हल्ले होत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने (USA) अफगानिस्तानच्या मदतीसाठी आपले B-52 बॉम्बरसह अनेक फायटर जेट पाठवले आहेत, ज्यांच्या माध्यमातून तालिबानी तळांवर प्रत्युत्तरात हल्ले केले जात आहेत.

अफगानिस्तानातल्या भारतीयांना धोका वाढला

अफगानिस्तानात तालिबान दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. आता इतर महत्वाच्या शहरांवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी आपला मोर्चा अफगानिस्तानातलं सर्वात मोठं शहर असलेल्या मजार ए शरीफकडे वळवला आहे. या भारात भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या भारतीयांना त्याचा धोका वाढला आहे.

AIRLIFT : IAF to evacuate Indian citizens from Afghanistan’s Mazar-e-Sharif amid Taliban attacks

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात