पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन इतिहास रचणाऱ्या सॅनची तिच्या पदकापेक्षा लहान केसांबद्दल अधिक चर्चा होत आहे. कोरियामध्ये या हेअरस्टाइलकडे पुरुष तिरस्काराने पाहत आहेत. South Korea Archers Came Under Target Of Men For Having Short Hair, Thousands Of Women Got Their Hair Cut In Support Started A Movement
विशेष प्रतिनिधी
सेऊल : दक्षिण कोरियन तिरंदाज ॲन सॅनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदके जिंकून जगभरातून वाहवा मिळवली. तिच्या स्वतःच्या देशातही तिचे स्वागत करण्यात आले, परंतु लहान केस राखल्यामुळे तिला पुरुषांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागले आहे.
पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन इतिहास रचणाऱ्या सॅनची तिच्या पदकापेक्षा लहान केसांबद्दल अधिक चर्चा होत आहे. कोरियामध्ये या हेअरस्टाइलकडे पुरुष तिरस्काराने पाहत आहेत.
सोशल मीडियावर लोकांनी 20 वर्षीय सॅनच्या हेअरस्टाईलला ‘फेमिनिस्ट’ म्हणून संबोधले. लोकांनी असेही लिहिले की, ‘तुम्ही फेमिनिस्ट वर्तन करावे यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या कराच्या पैशांतून प्रशिक्षण आणि सुविधा पुरवल्या नव्हत्या. जर ती स्त्रीवादी असेल तर मी पाठिंबा काढून घेत आहे.” पण एकीकडे टीका वाढत असताना दुसरीकडे हजारो कोरियन महिलाही सॅनच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत.
‘हॅशटॅग वुमन शॉर्टकट’ मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी लहान केसांसह स्वत:चे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे. हान जियांग या मोहिमेचे सूत्रधार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, निदर्शने करणाऱ्यांमध्ये बहुतांश तरुण पुरुष आहेत, यात अनेक वृद्ध आणि स्त्रियासुद्धा आहेत. सियान आणि इतर महिलांविरोधातील द्वेषयुक्त वक्तव्यांमुळे जियांग अस्वस्थ झाल्या. त्यांना वाटले की, लहान केस कापून सॅनला पाठिंबा देण्याबरोबरच महिला स्वातंत्र्याचा मुद्दाही उपस्थित करता येईल.
यानंतर ही मोहीम देशभर पसरली. सर्व महिलांनी त्यांचे केस कापण्याच्या आधी चित्र आणि केस कापल्यानंतरचे चित्र पोस्ट करण्यास सुरुवात केली. दक्षिण कोरियामध्ये पुरुषांच्या जुन्या पिढीला वाटते की, त्यांची स्थिती महिलांपेक्षा वरचढ आहे, तर तरुण पिढीला वाटते की, सर्व शक्ती स्त्रियांच्या हातात आहे आणि त्या फेमिनिस्ट विचारांच्या जोरावर पुरुषांना त्रास देत आहेत.
दक्षिण कोरियामध्ये पुरुषांच्या रागाचे एक कारण म्हणजे 18 ते 35 वयोगटातील पुरुषांना दोन वर्षे सैन्यात सेवा देणे बंधनकारक आहे. पण आजच्या पिढीचा त्यावर विश्वास नाही. त्यांना वाटते की यात केवळ दोन वर्षेच नव्हे तर दुखापत झाल्यास त्यांचे संपूर्ण आयुष्यच वाया जाते. परंतु सरकारी नियमांमुळे त्याच वयात स्त्रिया मात्र अशा उद्योगांमध्ये जागा बनवतात, ज्यात एकेकाळी पुरुषांचे वर्चस्व होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App