वृत्तसंस्था
चंदिगढ : पंजाबमध्ये नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु लुधियाना येथील दोन शाळांमधील २० मुलांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही बाब अन्य राज्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. 20 childrens of 2 schools ludhiana found covid positive
कोरोनाची दुसरी लाट अनेक राज्यांत ओसरत आहे. निर्बंध शिथील केले जात असून महाराष्ट्रसह अन्य ठिकाणी शाळा सुरु करण्याचे बेत आखले जात असताना लुधियानातील दोन शाळेतील मुलांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अनेक राज्यात बाधितांच्या संख्येत घट होत आहे. पण, काही भागात पुन्हा कोरोनाचा विषाणू उद्भवू लागला आहे. अशीच परिस्थिती पंजाब राज्यात आहे.कोरोना नियंत्रणात येत असल्याने पंजाब सरकारने नुकत्याच शाळा सुरु केल्या आहेत.
या दरम्यान लुधियानामधील २ शाळेतील एकूण ३० विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. यावरून तेथील सरकारचा निर्णय चुकला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असेल तर शाळा सुरु करणे महत्वाचे नाही, असे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, लुधियानाच्या सरकारी सिनिअर सेकंडरी स्कूल बस्ती जोधेवाल शाळेतील ८ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हे विद्यार्थी ११ वी आणि १२ वीचे आहेत.यानंतर संबंधित महाविद्यालय आणि शाळा बंद केली आहेत. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:ला गृह विलगीकरण करून घेतले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App