वृत्तसंस्था
वॅशिंग्टन : भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरील आर्थिक राजधानी मुंबईसह १२ शहरे शतकाअखेर समुद्राच्या पाण्याखाली जाण्याचा इशारा अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेने दिला आहे. जागतिक तपमान वाढीची चाहूल असणार आहे. 12 coastal cities of India will be submerged in sea water in coming years
समुद्र किनाऱ्यावरील १२ शहरे समुद्राखाली ३ फूट खाली असतील. हवामान बदला संदर्भातील आयपीसीसी या संस्थेने दिलेल्या अहवालाचे आधारे हा इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षात वादळ, पूर, मुसळधार पाऊस आणि महापुराचा सामना भारताला करावा लागत आहे. ही आगामी संकटांची चाहूल आहे.
जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फ आणि विविध ठिकाणच्या हिमनद्या वितळू लागल्या आहेत, भविष्यात त्याचे प्रमाण वाढत जाऊन समुद्रात पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात वाढेल. त्यामुळे समद्रकिनाऱ्याला मोठा फटका बसणार आहे. १२ शहरे पाण्याखाली निश्चित जाणार आहेत. त्यामध्ये मुंबई, चेन्नई, कोची, विशाखापट्टणमसह १२ शहरे पाण्याखाली जाणार आहेत.
याबाबतचे संशोधन १९८८ पासून सुरु आहे. तेव्हापासून हवामान बदलाचे इशारे देण्यात येत आहेत. पण, भारतीय राजकीय मंडळींना राजकारणापासून उसंत मिळाले तेव्हा याचा ते विचार करतील. समुद्राची पातळी वाढत आहे, याचा धोका आहे, हे वारंवार सांगितले जात आहे. केवळ आणि केवळ दक्षिण आशियात जागतिक तापमान वाढीचा धोका मोठा आहे.
समुद्र पातळी वाढत आहे, याकडे लक्ष वेधले. समुद्रपातळी वाढण्याबरोबरच वादळ, मुसळधार पाऊस, पूर आणि महापुराचे संकट दरवर्षी येणार आहे. उलट त्यात अधिकाअधिक वाढ होत जाणार आहे. सध्याच नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना राज्यकर्त्यांची भांबेरी उडत आहे. आपत्ती सांगून येत नाही, असे सांगितले जात आहे. पण, अनेकदा इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यानंतर संकट येताच धावाधाव करायची असे प्रकार घडत आहेत.
खालील बारा शहरे समुद्रात बुडणार
कांडला, ओखा, भाऊनगर, मुंबई, मोरमुगाओ, मंगळूर, कोचीन, पारादीप , खिदीरपूर, विशाखापट्टणम, चेन्नई, तूतीकोरिन
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App