विशेष प्रतिनिधी
परभणी : परभणीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादाला नवे धुमारे फुटले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीच्या वादातून दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. We Will Drown Ncp, says Shiv Sena Mp Sanjay Jadhav; Controversy Over Appointment Of District Collector Anchal goyal
परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद समोर आला आहे. या दनियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती होऊ नये यासाठी शिवसेना खासदाराने थेट मंत्रालयात लॉबिंग केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय जाधव यांनी या नियुक्तीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो असे खळबळजनक वक्तव्य संजय जाधव यांनी केले आहे. ते म्हणाले, की जेव्हा माकडीण सुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते. राष्ट्रवादीला आम्ही कधीही पायाखाली घालू. शेवटी आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलो. काल फक्त कलेक्टर बदलायचा होता तर मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीवाल्यांनी एवढे रान पेटवले जसे काही मोठा अपराध केला. “आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून”, अशी राष्ट्रवादीवाल्यांची अवस्था आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मान्य केला आहे. शेवटी काही मर्यादा असतात कुठं पर्यंत शांत बसायचे? कुठं पर्यंत सहन करायचे?, असा सवाल जाधव यांनी केला आहे. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर ३१ जुलैला आंचल गोयल या पदभार स्वीकारतील हे अपेक्षित होते. पदभार स्वीकारण्यासाठी त्या दोन दिवस आधी येथे आल्या. मात्र अचानक आपण अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवावा असा संदेश मुगळीकर यांना सामान्य प्रशासन विभागाकडून आला. गोयल यांना परत जावे लागले. या सर्व प्रकाराची माध्यमांनी दखल घेतली. सोशल मीडियात लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
परभणीच्या पुढाऱ्यांना केवळ आपल्या तालावर कारभार करणारे मर्जीतले रबरी शिक्केच हवे आहेत अशी सार्वत्रिक भावना तयार झाली होती. निदर्शने केली गेली. जागरूक नागरिक आघाडी या नावाने लोक एकवटल्यानंतर २४ तासांच्या आत अंचल गोयल याच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे पालकमंत्र्यांना जाहीर करावे लागले. तसे स्पष्टीकरण पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिल्याने या विषयाला पूर्णविराम मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App