वृत्तसंस्था
काबूल – अफगाणिस्तान सरकारच्या प्रसारमाध्यम केंद्राचे संचालक दवा खान मेनापाल यांच्यावर गोळ्या झाडून तालिबानने हत्या केली. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद यानेच ही माहिती दिली. ‘शुक्रवारची प्रार्थना सुरू असताना गोळीबार झाला, असे गृह मंत्रालयाचे उपप्रवक्ते हमीद रुशान यांनी सांगितले. अफगाणिस्तानच्या हंगामी संरक्षण मंत्र्यांना लक्ष करीत तालिबान्यांनी मंगळवारी बाँबहल्ला केला होता. त्यातून ते सुदैवाने बचावले.
सरकारचा प्रसिद्धी विभाग सांभाळणारे मेनापाल यांना आमच्या योद्ध्यांनी ठार केले आहे. अफगाण सरकारच्यावतीने प्रसिद्ध होणारी माहिती स्थानिक व परराष्ट्र प्रसारमाध्यमांना देण्यााची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मुजाहिदीनने हल्ला करून मेनापाल यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली, असे मुजाहिदने सांगितले, मात्र अधिक माहिती दिली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App