विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: जेईई मेन तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका ५ ऑगस्ट रोजी जाहीर झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या सत्राचा निकाल शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.Results of JEE Main exam likely to be declared tomorrow
पूरग्रस्त महाराष्ट्र वगळता देशभरातील उमेदवारांसाठी २०, २२, २५ आणि २७ जुलै रोजी जेईई मुख्य परीक्षा घेण्यात आली. यानंतर, एनटीएने ३ आणि ४ ऑगस्ट रोजी या क्षेत्रांमध्ये परीक्षा घेण्याची घोषणा केली होती.
पाच ऑगस्ट रोजी एनटीएने उत्तर पत्रिका जाहीर केली आहे. त्यामुळे जेईई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. एनटीएकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
या वर्षी ७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा सत्र ३ साठी नोंदणी केली होती. जेईई मुख्य निकालासह, एनटीए कटऑफ आणि स्कोअरकार्ड देखील जारी करेल. उमेदवारांना jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App