सत्तेतून पायउतार होताच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा मोठ्या अडचणीत, न्यायालयाचे समन्स

विशेष प्रतिनिधी

बंगळूर – सत्तेतून पायउतार होताच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यामागे नवे शुक्लकाष्ठ लागले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने येडियुरप्पा आणि त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह अनेकांना मंगळवारी नोटीस बजावली होती. तथापि, उच्च न्यायालयाने गुरुवारी समन्स जारी केले असून सर्वांना १७ ऑगस्ट रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहाण्याची सूचना केली.Summons issued against yeddiyurappa

येडियुरप्पा यांचे नातू शशिधर मराडी, मुलगी पद्मावती, जावई विरुपाक्षप्पा यमकनमरडी, नातेवाईक संजय श्री, मंत्री एस. टी. सोमशेखर, आयएएस अधिकारी जी. सी. प्रकाश, के. रवी, उद्योजक चंद्रकांत रामलिंगम यांना उच्च न्यायालयाच्या एक सदस्य पीठाने नोटीस बजावली होती.



सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने समन्स जारी केले. बंगळूर विकास प्राधिकरण (बीडीए) गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाच दिल्याचा आरोप करत अब्राहम केला होता.

Summons issued against yeddiyurappa

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात