विशेष प्रतिनिधी
ढाका – बांगलादेशमधील एका शिक्षकाकडून पोलिसांनी भगवान विष्णूची एक मूर्ती ताब्यात घेतली आहे. ही मूर्ती एक हजार वर्षांहून अधिक जुनी असून काळ्या पाषाणात कोरलेली आहे. ही मूर्ती फार प्राचीन असून ती अत्यंत मौल्यवान आहे. ती तातडीने संग्रहालयात ठेवून तिचे योग्य प्रकारे जतन करायला हवे, असे मत येथील पुरातत्व खात्याने व्यक्त केले आहे.Thousand year old god idol found in Bangaladesh
कमिला जिल्ह्यातील बोरो गावली गावातून पोलिसांनी ही मूर्ती ताब्यात घेतली आहे. मूर्तीची उंची २३ इंच असून रुंदी ९.५ इंच आहे. मूर्तीचे एकूण वजन १२ किलो आहे. अबू युसुफ या शिक्षकाला दीड महिन्यांपूर्वीच ही मूर्ती सापडली होती.
तलावासाठी खोदकाम सुरु असताना त्याला मूर्ती मिळाली. मात्र, त्याने याबाबतची माहिती लपवून ठेवली होती. युसूफ यांनी माहिती लपवून ठेवल्याचा आरोप फेटाळला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App