वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गावात गणपती मंदिरावर धर्मांध इस्लामी धर्मांधांनी केलेल्या हल्ल्याचा भारत सरकारने तीव्र निषेध केला असून पाकिस्तानच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयात पाचारण करून निषेध पत्र त्यांच्या हाती सोपविण्यात आले आहे. Pak Charge d’Affaires was summoned&firm protest was lodged expressing grave concerns at this reprehensible incident&attacks on freedom of religion
पाकिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये अल्पसंख्यांक विशेषतः हिंदूंच्या धार्मिक हक्कांची गळचेपी होत असल्याची जाणीव पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी करून दिली.
Within the last year itself, various temples and Gurudwaras have been attacked including the Mata Rani Bhatiyani Mandir in Sindh in January 2020, Gurudwara Sri Janam Sthan in January 2020, a Hindu temple in Karak in Khyber Pakhtunkhwa in Dec 2020: MEA Spokesperson Arindam Bagchi — ANI (@ANI) August 5, 2021
Within the last year itself, various temples and Gurudwaras have been attacked including the Mata Rani Bhatiyani Mandir in Sindh in January 2020, Gurudwara Sri Janam Sthan in January 2020, a Hindu temple in Karak in Khyber Pakhtunkhwa in Dec 2020: MEA Spokesperson Arindam Bagchi
— ANI (@ANI) August 5, 2021
पाकिस्तानात गेल्या काही वर्षात हिंदू मंदिरे आणि शीख गुरुद्वारे यांच्यावर इस्लामी धर्मांध हल्ले करीत आहेत. पाकिस्तानी सरकार हे हल्ले रोखण्यात आणि धर्मांधांना वेसण घालण्यात कमी पडते आहे. याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. भारतातल्या कथित असहिष्णूतेबद्दल नेहमी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर हल्लागुल्ला करत असते. परंतु स्वतःच्या देशात मात्र हिंदू अल्पसंख्यांक तिथे सुरक्षित नाहीत. त्यांच्या धार्मिक स्थळांवर मंदिरांवर, शीख गुरुद्वारांवर इस्लामी धर्मांध हल्ले करतात त्यावेळी पाकिस्तान सरकार मूग गिळून गप्प बसते, याचा तीव्र निषेध भारताने केला आहे.
धर्मांध हल्लेखोरांना ताबडतोब पकडून पाकिस्तानी कायद्याद्वारे शिक्षा केली पाहिजे ही मागणी या पत्राद्वारे पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याआधी पाकिस्तानच्या सरहद्द प्रांतात तसेच सिंधमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले करून मोडतोड करण्यात आली होती. त्यावेळी देखील पाकिस्तानी सरकारने योग्य ती कारवाई केली नसल्याचा परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांपुढे स्पष्ट बजावले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App