विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पेगॅसस पाळतप्रकरणाची विद्यमान अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशीकुमार यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे.
भारताप्रमाणेच जगभरात याचे पडसाद उमटत असल्याने याबाबत तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. यावर सरन्यायाधीशांनी पुढील आठवड्यांत आपण सुनावणी घेऊ असे सांगितले.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांचे म्हणणे ऐकून घेतले. या विषयाचे गांभीर्य आणि त्याची व्यापकता लक्षात घेऊन त्याबाबत तत्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर होत असून विरोधी पक्ष नेते, पत्रकार आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी या स्पायवेअरचा वापर करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App