लेथपोरा, पुलवामा हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी महंमद इस्लाम अल्वी उर्फ लंबूला सुरक्षा दलांचे कंठस्नान; अल्वीचा मसूद अजहरच्या कुटुंबाशी संबंध

वृत्तसंस्था

श्रीनगर – जम्मू – काश्मीरमध्ये लेथपोरा, पुलवामा हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी महंमद इस्लाम अल्वी याला सुरक्षा दलांनी चकमकीत कंठस्नान घातले. त्याच्याबरोबर दुसराही दहशतवादी मारला गेला आहे. अल्वी हा पाकिस्तानात पळून गेलेला कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबांशी संबंधित होता. Mohd Ismal Alvi (File pic) was involved in conspiracy and planning of Lethpora Pulwama attack and figured in chargesheet produced by NIA

महमंद इस्लाम अल्वी याचा लेथपोरा, पुलवामा हल्ल्याच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत हात होता. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या आरोपपत्रात त्याच्या विरूध्द पुरावे असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, त्याची नोंद फरार आरोपी म्हणून करण्यात आली होती. त्याच बरोबर तो २०१९ मध्ये जुनैदपुरा हल्ल्यात देखील सामील असल्याचे पोलीसांनी सांगितले.

महमंद इस्लाम अल्वीला दहशतवाद्यांमध्ये लंबू उर्फ अदनान उर्फ सैफुल्ला या नावांनी देखील संबोधले जायचे. तो आदिल दर याच्या सोबत फिदायिन हल्ल्याच्या दिवसापर्यंत राहात होता. त्याचा जो विडिओ व्हायरल झाला त्यामध्ये अली दरचा आवाज आहे. आणि तो सुरक्षा दलांनी टिपला आहे, अशी माहिती देखील पोलीसांनी दिली.

सैफुल्ला ठार झाल्यामुळे पुलवामा हल्ल्यात सामील झालेल्या दहशतवाद्याला कंठस्थान घातल्याचे समाधान सुरक्षा दलांना मिळाल्याचे चिनार कॉर्पसचे कमांडर लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी पत्रकारांना सांगितले.

 

 

Mohd Ismal Alvi (File pic) was involved in conspiracy and planning of Lethpora Pulwama attack and figured in chargesheet produced by NIA

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात