भाजप नेत्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील अनेक नेत्यांनीही पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं होतं ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटकडे. Happy Birthday to Pankaja of Fadnavis. Read What exactly is a case?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा काल वाढदिवस होता . वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांच्यावर अनेक शुभेच्छांचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला दिसला. भाजप नेत्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील अनेक नेत्यांनीही पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं होतं ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटकडे.
देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पंकडा मुंडे ताई! मी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्ट चिंतितो! असं ट्वीट करत फडणवीसांना पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर एक तासाभराने पंकजा मुंडे यांनीही त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.आणि फडणवीस यांच्या ट्वीटला उत्तर देत पंकजा मुंडे यांनी त्यांचे आभार मानले . थँक्यू देवेनजी, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत.
Thank you Devenji. — Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 26, 2021
Thank you Devenji.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 26, 2021
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. नव्या मंत्र्यांची यादी जाहीर होण्यापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, राज्यातून डॉ. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. पुढे राज्यात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या राजीनाम्याचं सत्र येथुन मुळात सुरु झालं.
पंकजा मुंडे दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना राजीनामे परत घेण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी समर्थकांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपले नेते आहेत, असं भाष्य केलं. मात्र, आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलच नाही.
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबाबत माध्यमांनी फडणवीसांना विचारलं. त्यावर बोलताना “पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असं म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं होतं. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी पंकजा मुंडे यांना दिलेल्या शुभेच्छा आणि पंकजा मुंडे यांनी मानलेले आभार, या दोन ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App