conspiracy against jharkhand government Case : झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकार पाडण्यासाठी कट रचण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. हवालामार्फत वित्तपुरवठा करणारा खरोखर आमदारांशी संपर्क साधत होता का, याचा अद्याप उलगडा झाला नाही. झारखंड मुक्ती मोर्चाने याप्रकरणी भाजपवर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटकही करण्यात आली आहे. पण आता जी माहिती समोर येत आहे, त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. कारण आरोपींपैकी एक जण फळ विक्रेता असून दुसरा मजूर असल्याचे समोर आले आहे. conspiracy against jharkhand government Case Has Big Twist of the accused vegetable vendor and other a laborer
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकार पाडण्यासाठी कट रचण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. हवालामार्फत वित्तपुरवठा करणारा खरोखर आमदारांशी संपर्क साधत होता का, याचा अद्याप उलगडा झाला नाही. झारखंड मुक्ती मोर्चाने याप्रकरणी भाजपवर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटकही करण्यात आली आहे. पण आता जी माहिती समोर येत आहे, त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. कारण आरोपींपैकी एक जण फळ विक्रेता असून दुसरा मजूर असल्याचे समोर आले आहे.
टाइम्स नाऊने याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांन दिलेल्या वृत्तानुसार, झारखंडमध्ये सरकार पाडण्याचे षडयंत्र रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन जणांच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तीन जणांपैकी एक फळ विक्रेता असून दुसरा मजूर आहे. हे दोघेही बोकारोचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बोकारो येथील घरातून त्यांना उचलले. येथे पोलिसांनी या तिघांना राजधानी रांचीतील ले-लॅक हॉटेलमधून अटक केल्याचा दावा केला आहे.
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, निवारण प्रसाद महतो बोकारोमध्ये भाजीपाला आणि फळांची गाडी लावतो, तर अमित सिंग रोजंदारीवर मजुरी करतो. अटक केलेले दोघेही निर्दोष असल्याचा दावा निवारण प्रसाद महतो यांचे मेहुणे सोनू कुमार यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात केला आहे. एका प्रकरणात चौकशी करावी लागेल, असे सांगून पोलिसांनी दोघांना बोकारो येथे दोन दिवसांपूर्वी पकडले होते. दीड तासांत त्यांना सोडले जाईल, असेही म्हटले होते.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार अमित सिंगचे वडील मदन सिंह यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलाला पोलिसांनी बोकारो येथून नेले होते. त्यांनी जेव्हा अमितला नेण्यामागील कारण विचारले तेव्हा पोलिसांनी काहीही सांगितले नाही. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुमचा मुलगा काय करतो, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, तो एक मजूर आहे. मदन सिंग यांना पुन्हा विचारण्यात आले की, तुमच्या मुलाचा काही राजकीय संबंध आहे का, तर त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मला काहीच माहिती नाही.
याबरोबरच अटकेतील आरोपी निवारण प्रसाद महतो याचे नातेवाईक म्हणतात की, निवारण फळांची विक्री करण्याचे काम करतो, ज्या दिवशी बोकारोच्या शहर पोलिसांनी त्याला उचलले, त्या दिवशी ते पोलिस ठाण्यात गेले होते. पोलिस स्टेशनमध्ये डीएसपी म्हणाले की, तुम्ही पाहू शकता की तो आरामात आहे, त्यानंतर त्याला गाडीतून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. यासंदर्भात डीएसपी साहेबांना विचारले असता ते म्हणाले की, तुम्हाला कळविण्यात येईल. माहिती न मिळाल्याने त्या लोकांनी पुन्हा डीएसपींना भेट दिली, तेव्हा निवारण प्रसाद महतो रांची येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली.
या सर्व खुलाशांमुळे आता झारखंड पोलिसांच्या हेतूंवरच संशय उत्पन्न होत आहे. दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आता झारखंडमध्ये 2 लाखात 4 माणसे मिळून आमदार खरेदी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी झारखंडच्या आमदारांसाठी 10 हजारांची किंमत लावली आहे. बकरीदमध्ये बकऱ्याची किंमत यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे? धन्य मुख्यमंत्री, धन्य आमदार, धन्य पोलीस!
conspiracy against jharkhand government Case Has Big Twist of the accused vegetable vendor and other a laborer
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App