विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुप्तचर विभागाच्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपला फोन टॅप होत असल्याचे सांगितले आहे. फोनवर काय बोलू नये हे आपल्याला मित्रांमार्फत सांगितले जाते.Rahul Gandhi targets govt.
मात्र, मी कुणालाही घाबरत नाही आणि याचा मला काहीही फरक पडत नाही, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला उघड आव्हान दिले. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालय तसेच राफेल गैरव्यवहाराची चौकशी रोखण्यासाठी पेगॅससचा वापर करण्यात आल्याचाही दावा राहुल गांधींनी केला. ते म्हणाले, आपला फोन टॅप करण्यात आला.
हा आपल्या खासगीपणाचा विषय नव्हे. विरोधी पक्षनेता या नात्याने आपण जनतेचे प्रश्न मांडतो. पंतप्रधान मोदींनी पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर आपल्या देशाविरुद्ध केला आहे. यासाठी पंतप्रधान आणि गृह मंत्री यांच्याशिवाय दुसरा कोणीही परवानगी देऊ शकत नाही.
त्यामुळे शाह यांनी राजीनामा द्यावा.ते म्हणाले, की इस्राईल सरकारने सर्वप्रथम पेगॅससचा एक शस्त्र म्हणून वापर केला. आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकशाही विरोधात त्याचा वापर करत आहेत. हे आक्रमण जनतेच्या आवाजावर आहे.
अनिल अंबानींचा फोन टॅप झाला हा प्रश्न नाही, तर सीबीआय गुन्हा दाखल करणार असताना बरोबर त्याआधी सीबीआय संचालकांचा फोन टॅप करून त्यांना ब्लॅकमेल केले जाते.
हत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App