विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामतीत २९ जुलैला होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाची पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या मोर्चात सत्तेतील विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार होते. दरम्यान आता मोर्चाला परवानगी नाकारल्याने हा विषय चिघळण्याची चिन्हे आहेत. Baramati Police denied permission To the Elgar Mahamorcha; activists Angry
ओबीसीचं अतिरिक्त आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविल्यानं बारामतीत राज्यातील पहिला ओबीसी एल्गार मोर्चा होणार होता.२९ तारखेला बारामतीत ओबीसींचा पहिला एल्गार मोर्चा होणार असल्याची माहिती आरक्षण कृती समितीने दिली आहे. मात्र बारामती शहर पोलिसांनी या मोर्चाची परवानगी नाकारली आहे.
नाना पटोले, विजय वडेट्टीवार,छगन भुजबळ महादेव जानकर,राम शिंदे,पंकजा मुंडे,योगेश टिळेकर, इम्तियाज जलील,रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे या मोर्चाची परवानगी नाकारली आहे.यामुळे आता हा विषय चिघळण्याची चिन्हे आहेत. बारामती ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी यासंदर्भात आयोजकांना कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App