Ajoy Mehta : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आणि माजी सनदी अधिकारी अजोय मेहता सध्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. बेनामी प्रॉपर्टीअंतर्गत अजय मेहता यांच्या नरिमन पॉइंट फ्लॅटशी संबंधित डीलचा प्राप्तिकर विभाग तपास करत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अजोय मेहता यांना महारेराचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. Chief Minister Thackerays Advisor Ajoy Mehta is on Income Tax Radar, Inquiry into Flat Deal
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आणि माजी सनदी अधिकारी अजोय मेहता सध्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. बेनामी प्रॉपर्टीअंतर्गत अजय मेहता यांच्या नरिमन पॉइंट फ्लॅटशी संबंधित डीलचा प्राप्तिकर विभाग तपास करत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अजोय मेहता यांना महारेराचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार प्राप्तिकर विभागाच्या बेनामी सेक्शकडून एक प्रकरण उघडकीस आले आहे. ज्यामध्ये नरिमन पॉईंटमध्ये जी प्रॉपर्टी डील झाली होती, ती शेल कंपनी आणि सेवानिवृत्त अधिकारी यांच्यात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार अजोय मेहता यांनी नरिमन पॉईंट परिसरातील फ्लॅट खरेदी केला होता, तो शेल कंपनी अनामित्र प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आला. या कंपनीचे दोन भागधारक आहेत, जे मुंबईच्या चाळीत राहतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही कंपनी केवळ हा करार करण्यासाठी तयार केली गेली. यामुळे प्राप्तिकर विभागाचा संशय या दिशेने गेला. या कंपनीच्या ताळेबंदात बरीच तफावत आहेत, तसेच भागधारकदेखील नॉन-फाइलर आहेत. यामुळे यात काहीतरी गडबड झाल्याचा संशय येतो.
अजोय मेहता यांनी मागील वर्षी हा 1076 चौरस फुटांचा फ्लॅट 5.33 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला. 2009 मध्ये ही मालमत्ता अनामित्रा प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडे होती, असे सांगण्यात आले होते. तेव्हा त्याचे मूल्य चार कोटी रुपये होते.
कंपनीचा भागधारक कामेश नथुनी सिंग ज्यांच्याकडे 99 टक्के समभाग आहेत ते नॉन-फायलर आहेत. त्यांचा पत्ता ओबेरॉय मॉलजवळ देण्यात आला आहे, तर दुसरा भागधारक दीपेश रवींद्र सिंह आहे, ज्यांनी फक्त एकच रिटर्न भरला आहे, ज्यामध्ये उत्पन्न 1,71,002 रुपये देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कंपनीचे भागधारक अशा लोकांना दर्शविण्यात आहे ज्यांचे उत्पन्न कमी आहे आणि एवढ्या महागड्या प्रॉपर्टी सांभाळणे त्यांच्यासाठी कठीण आहे. या संपूर्ण वादावर अजोय मेहता यांनी इंडिया टुडेला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, प्रॉपर्टीच्या मालकाची माहिती माझ्याकडे असण्याचे कोणतेही कारण नाही. हा कायदेशीर करार होता, जी योग्य मार्गाने करण्यात आली होती. आणि मी बाजारभावाप्रमाणे पैसे दिले. तरीही हे सर्व कुठून येत आहे याची त्यांना कल्पना नाही.
Chief Minister Thackerays Advisor Ajoy Mehta is on Income Tax Radar, Inquiry into Flat Deal
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App