Taliban fires Rockets Near Presidential Palace In Kabul : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यापासून तालिबानची दहशत वाढत आहे. अफगाणिस्तानाची राजधानी काबुल पुन्हा एकदा स्फोटांच्या आवाजाने हादरली आहे. मंगळवारी सकाळी काबूलमधील राष्ट्रपती भवनाजवळ रॉकेट हल्ल्यामुळे सर्वजण स्तब्ध झाले. राष्ट्रपती अशरफ गनी बकरीदच्या प्रार्थनेत भाग होत असताना हा हल्ला झाला. Afghanistan Taliban fires Rockets Near Presidential Palace In Kabul During Eid Prayers
वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यापासून तालिबानची दहशत वाढत आहे. अफगाणिस्तानाची राजधानी काबुल पुन्हा एकदा स्फोटांच्या आवाजाने हादरली आहे. मंगळवारी सकाळी काबूलमधील राष्ट्रपती भवनाजवळ रॉकेट हल्ल्यामुळे सर्वजण स्तब्ध झाले. राष्ट्रपती अशरफ गनी बकरीदच्या प्रार्थनेत भाग होत असताना हा हल्ला झाला.
अफगाण माध्यमांच्या वृत्तानुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी आठच्या सुमारास हा हल्ला झाला. ज्या ठिकाणी हे स्फोट झाले त्या ठिकाणाहून राष्ट्रपती भवन अगदी जवळ आहे. या हल्ल्याबाबत असे मानले जाते की, हल्ल्याचे लक्ष्य अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी असू शकतात.
UPDATE | Three rockets landed in areas near the Presidential Palace during Eid prayers. Rockets were fired from Parwan-e-Se area & landed in Bagh-e-Ali Mardan & Chaman-e-Hozori areas in Kabul's Dist 1 & Manabe Bashari area in Kabul's Dist 2: Afghanistan's TOLOnews quoting sources — ANI (@ANI) July 20, 2021
UPDATE | Three rockets landed in areas near the Presidential Palace during Eid prayers. Rockets were fired from Parwan-e-Se area & landed in Bagh-e-Ali Mardan & Chaman-e-Hozori areas in Kabul's Dist 1 & Manabe Bashari area in Kabul's Dist 2: Afghanistan's TOLOnews quoting sources
— ANI (@ANI) July 20, 2021
माध्यमांच्या वृत्तानुसार, राष्ट्रपती भवन आणि ग्रीन झोनच्या सभोवतालच्या भागात तीन रॉकेट डागण्यात आले. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील राष्ट्रपती भवनाजवळ किमान तीन रॉकेट डागण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ईदच्या प्रार्थनेवेळी बाग-ए-अली मर्दन, काबूलमधील चमन-ए-होजोरी आणि राष्ट्रपती भवनाजवळील मनेबे बशारी भागात रॉकेट डागण्यात आले. येथे सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये बर्याच दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.
सुमारे दोन दशकांपर्यंत अफगाणिस्तानात राहिल्यानंतर अमेरिकन सैन्य मायदेशी परतत आहे, आता तालिबानचा ताबा अधिकाधिक वाढत चालला आहे. अमेरिकन आणि नाटो सैनिक गेल्यानंतर असे वृत्त आले होते की ज्या तालिबान्यांचा खात्मा करण्यासाठी पाश्चात्य देशांसह अमेरिकेने युद्ध लढले, त्यांनीच आता पुन्हा अफगाणिस्तानाच्या बर्याच भागांचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे.
Afghanistan Taliban fires Rockets Near Presidential Palace In Kabul During Eid Prayers
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App