mother obscene dance with son : सोशल मीडियावर काही लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात काही जण सर्व मर्यादा ओलांडण्यास तयार होतात. कित्येक दिवसांपासून एक महिलाही आपल्या लहान मुलाबरोबर अश्लील नृत्य करून ते सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करत होती. सुरुवातीला लोकांनी याकडे दुर्लक्ष केले, परंतु आता दिल्ली महिला आयोगाने (डीडब्ल्यूसी) या प्रकरणाची दखल घेतली आहे. यानंतर या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी दिल्ली पोलिसांना करण्यात आली आहे. mother obscene dance with son on social media Delhi women commission notice to police for FIR
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सोशल मीडियावर काही लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात काही जण सर्व मर्यादा ओलांडण्यास तयार होतात. कित्येक दिवसांपासून एक महिलाही आपल्या लहान मुलाबरोबर अश्लील नृत्य करून ते सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करत होती. सुरुवातीला लोकांनी याकडे दुर्लक्ष केले, परंतु आता दिल्ली महिला आयोगाने (डीडब्ल्यूसी) या प्रकरणाची दखल घेतली आहे. यानंतर या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी दिल्ली पोलिसांना करण्यात आली आहे.
ये महिला अपने ही छोटे बच्चे के साथ सोशल मीडिया पर वायरल होने के लिए अश्लील वीडियो बना माँ बेटे के पवित्र रिश्ते को कलंकित कर रही है। इस उम्र में अगर बच्चे को ऐसी गलत सीख मिलेगी तो आगे उसका महिलाओं के प्रति व्यवहार कैसा होगा। महिला पे FIR करने के लिए हमने पुलिस को नोटिस भेजा है। pic.twitter.com/xpe37kD2kM — Swati Maliwal (@SwatiJaiHind) July 19, 2021
ये महिला अपने ही छोटे बच्चे के साथ सोशल मीडिया पर वायरल होने के लिए अश्लील वीडियो बना माँ बेटे के पवित्र रिश्ते को कलंकित कर रही है। इस उम्र में अगर बच्चे को ऐसी गलत सीख मिलेगी तो आगे उसका महिलाओं के प्रति व्यवहार कैसा होगा। महिला पे FIR करने के लिए हमने पुलिस को नोटिस भेजा है। pic.twitter.com/xpe37kD2kM
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) July 19, 2021
डीडब्ल्यूसीच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संबंधित महिला आणि तिच्या मुलाचे चार फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत, ज्यात दोघांचे चेहरे अस्पष्ट आहेत. त्यांनी सांगितले की इन्स्टाग्रामवर या महिलेचे 1.60 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या मुलासह अश्लील गाण्यांवर डान्स केला. यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. वाद वाढत असल्याचे पाहून त्या महिलेने व्हिडिओ हटविला. महिलेची ओळख उघडकीस आलेली नसली तरी व्हिडिओ पाहता तिच्या मुलाचे वय 10-12 वर्षे असल्याचे दिसून येते.
Statement of DCW Chief @SwatiJaiHind on the issue of a 10-12 year old boy being made to act and dance in a vulgar manner in social media videos by his own mother. pic.twitter.com/iDYxoYazCF — Rahul Tahiliani (@Rahultahiliani9) July 19, 2021
Statement of DCW Chief @SwatiJaiHind on the issue of a 10-12 year old boy being made to act and dance in a vulgar manner in social media videos by his own mother. pic.twitter.com/iDYxoYazCF
— Rahul Tahiliani (@Rahultahiliani9) July 19, 2021
महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी व्हिडिओसह दिल्ली पोलिसांकडे तक्रार पाठवली आहे. तसेच महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार लहान वयातील मुलाला महिलेने चुकीची शिकवण दिली आहे. आई-मुलाच्या पवित्र नात्याला त्यांनी कलंकित करण्याचे काम केले आहे. ते मूल मोठे होईल तेव्हा स्त्रियांबद्दल त्याचा दृष्टीकोन काय असेल? आयोगाने अशी भीती व्यक्त केली आहे की, हे असेच सुरू राहिल्यास भविष्यात मुलामध्ये गुन्हेगारी मानसिकता उद्भवू शकते. दुसरीकडे पोलिसांनी महिलेविरोधात कारवाई केल्यास कमिशन मुलाच्या समुपदेशनासह पुनर्वसनाचे काम करेल.
दुसरीकडे स्वाती मालीवाल म्हणाल्या की, त्या कोणत्याही प्रकारे सोशल मीडियाच्या विरोधात नाहीत. आपली कला दर्शविण्यासाठी सोशल मीडिया एक चांगले व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. पण लाइक आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी काही जण सर्व मर्यादा ओलांडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. याव्यतिरिक्त त्यांनी सोशल मीडियावरून असे व्हिडिओ त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. मालीवाल यांच्या म्हणण्यानुसार महिलांच्या हितासाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, परंतु जर एखादी महिला चुकीची वागली तर त्या तिची तक्रार करणारच.
mother obscene dance with son on social media Delhi women commission notice to police for FIR
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App