विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : सुमारे १३ वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी सिंगूर येथे टाटांकडून उभारलेल्या जात असलेल्या नॅनो प्रकल्पाला विरोध केला. डाव्या आघाडी सरकारविरोधात मोठे आंदोलन उभे करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली.Mamata Banerjee, who came to power through the Singur movement, now inviting Tata
भूसंपादन विरोधी आंदोलनामुळे टाटा उद्योगाच्या घोट्या मोटार प्रकल्पाला पश्चिम बंगालमधून निघून जाणे भाग पडले आता त्याच ममता बॅनर्जी यांच्या सरकारने टाटांना गुंतवणुकीसाठी पायघड्या घातल्या आहेत.
राज्याचे उद्योग व माहिती तंत्रज्ञान मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले की, राज्यात मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीसाठी टाटांशी बोलणी सुरू आहेत. रोजगार निर्मितीला तृणमूल काँग्रेस सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
कंपन्यांना प्रोत्साहन अनुदान त्यांच्या रोजगारनिर्मितीच्या क्षमतेवर अवलंबून राहिल. कुठल्याही बड्या औद्योगिक घराण्यामार्फत दोन मोठे निर्मिती उद्योग उभारले जावेत, अशी ममता बॅनर्जी सरकारची इच्छा आहे.
चॅटर्जी म्हणाले, आमचे टाटांशी कधीही कुठल्या प्रकारचे शत्रुत्व नव्हते, किंवा आम्ही त्यांच्याशी लढलोही नाही. या देशातील तसेच परदेशातीलही सर्वात आदरणीय औद्योगिक घराण्यांपैकी ते एक आहेत. सिंगूरमध्ये जो विचका झाला, त्यासाठी तुम्ही टाटांना दोष देऊ शकत नाही.
समस्या डाव्या आघाडीच्या सरकारबाबत आणि त्याच्या जबरीने भूसंपादन करण्याच्या धोरणाबाबत होती. बंगालमध्ये येण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी टाटा समूहाचे नेहमीच स्वागत आहे. टाटा समूहाने कोलकात्यात कार्यालये थाटण्यासाठी, आणखी एक टाटा केंद्र स्थापन करण्यात रस दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App