वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या वावड्या दिल्ली – मुंबईत उडविण्यात आल्यानंतर पवार आधी राज्यसभेचे नेते पियूष गोयल यांना भेटले. त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज पवारांनी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. Modi – Pawar meeting comes in the background of many such Pawars meetings
त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपापासून ते दिल्लीतली १० जनपथ भोवतीची राजकीय जमीन हादरल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.
पवारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खाते सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्रात शिखर बँक घोटाळ्यापासून अनेक घोटाळ्यांमध्ये पवारांसह अनेकांच्या माना अडकलेल्या आहेत. पवारांनी नेमलेले गृहमंत्री अनिल देशमुखांची संपत्ती जप्त करण्यापर्यंत ED ची मजल गेली आहे. अजित पवारांच्या मामांच्या घरच्या कंपनीचा साखर कारखाना जप्त करण्यापर्यंत ED ची कारवाई येऊन ठेपली आहे.
अजून ९ कारखाने जे पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित आहेत, त्या कारखान्यांपर्यंत ED चे हात केव्हाही पोहोचू शकतात, अशी अवस्था आहे. जी अवस्था राष्ट्रवादीची आहे, तीच अवस्था शिवसेनेच्या नेत्यांची आहे. अनिल परबांचे नाव ED च्या रडारवर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App