विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पंजाब प्रदेश कॉंग्रेसची धुरा देण्याची येण्याची शक्यता आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद संपवण्याचा ‘फॉर्म्युला’ तयार झाला आहे. यानुसार राज्यातील प्रदेशाध्यक्ष सिद्धूकडे तर मुख्यमंत्रिपदी कॅप्टन अमरिंदरसिंग कायम राहतील. Siddhu will become Punjab congress president
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सिंग यांनी भेट घेतली होती. तर सिद्धू यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांची भेट घेतली होती. कॅप्टन सिंग आणि सिद्धू यांनी पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य राहील, असे मत मांडले आहे.
पंजाबात अकाली दलाचे social engineering; शीख मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री; एक दलित, एक हिंदू…!!
पंजाबमधील फॉर्म्युलाची माहिती हरीश रावत यांनी दिली. ते म्हणाले की, नव्या सूत्रानुसार कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्रिपदी राहतील. रावत म्हणाले की, अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. पंजाबमध्ये आता कोणतेही मतभेद नाहीत. अलीकडेच सिद्धूने केलेल्या ट्विटबाबत हरिश रावत म्हणाले की, सिद्धू यांची मत मांडण्याची अनोखी शैली आहे. त्यांनी कौतुक केले तरी ती टीका वाटते. यात बदल करणे शक्य नाही. येत्या काही दिवसांत पंजाब कॉंग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App