विशेष प्रतिनिधी
पुणे : दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. The results of the 10th exam will be announced tomorrow, informed Education Minister Varsha Gaikwad
इयत्ता १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी राज्य सरकारनं इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इयत्ता १० वीच्या निकालासाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. यासाठी १० जून रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार आयोजित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून इयत्ता दहावीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने ठरविली आहे. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निकालाच्या सूत्रानुसार इयत्ता नववी व दहावी या दोन्ही इयत्तांमध्ये शाळांनी घेतलेल्या परीक्षांचे गुणांचे रूपांतर शंभर गुणांमध्ये करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ३० गुण, विद्यार्थ्यांचे इयत्ता १०वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यवक्षक परीक्षा यांच्या आधारे २० गुण, विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीच्या अंतिम निकालात मिळालेल्या गुणांचे ५० टक्के वेटेज असे विषयनिहाय एकूण १०० गुणांपैकी मूल्यांकन होणार आहे. प्रत्येक विषयातील १०० गुणांपैकी नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वेटेज वापरून अंतिम निकाल तयार होणार आहे.
विविध परीक्षा मंडळांनी या वर्षी इयत्ता दहावी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे ही परीक्षा मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असे शंभर गुणांच्या परीक्षेसाठी बहुपयार्यी प्रश्न व ओएमआर पद्धतीने दोन तासाची असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App