विशेष प्रतिनिधी
अकोला : अकोला येथील एका मेळाव्यात गाणे म्हणत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर उपचार झाले आहेत. माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होतेय काहिली हे गाणे ते गात होते.Amol Mitkari got a stroke while singing in party’s rally
अकोला शहरातील एका फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यावेळी उपस्थित होत्या. या मेळाव्यात मिटकरी हे गाणे गात होते. यावेळी त्यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला.
शहरापासून काही अंतरावर हिंगणा येथील एका फार्मसी कॉलेजमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू होता. आमदार अमोल मिटकरी यांनी मनोगतादरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एक गीत गायला सुरवात केली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकड राहिली.
माझ्या मनाची होतीया काहिली’ हे पाणे गायला सुरुवात केली.तेवढ्यात त्यांची बोबडी वळली व आवाज बदलून किंचीत तोंडही वाकडे झाले. हा प्रकार जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मिटकरींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. वेळेवर उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.
अमोल मिटकरी यांनी स्वत: एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘माझी प्रकृती आता सुधारते आहे. चिंता करण्यासारखं काही नाही. कोविडचा काळ आहे. त्यामुळं स्वत:चा जीव धोक्यात घालून कुणीही मला भेटायला येऊ नये, अशी विनंती मिटकरी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App