प्रतिनिधी
अहमदनगर – पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या काही थांबायला तयार नाहीत. त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्रही थांबलेले नाही. बीडनंतर नगरच्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील समारे ३० ते ३५ समर्थकांनी विविध पदांचे राजीनामे पक्षाकडे दिले आहेत. तर पाथर्डीतून ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे पाथर्डी तालुका विकास आघाडी’ स्थापन करण्याचा पर्यायही कार्यकर्त्यांनी सूचविला आहे. Pankaja munde supporters suggests gopinath munde vikas aghadi for future politics
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेररचनेत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल, अशी समर्थकांना आपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. शिवाय यापूर्वी पंकजा मुंडे यांचीही भाजपकडून उपेक्षा झाल्याचा समर्थकांचा दावा आहे. त्यामुळे नाराजी वाढत गेली. त्याचा परिणाम म्हणून बीड जिल्ह्यातील भाजपच्या पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले.
नगर जिल्ह्यातही मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे पाथर्डी आणि शेवगावमधील त्यांच्या समर्थकांनीही आपल्या विविध पदाचे राजीमाने पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सोपविले आहेत. हा प्रकार सुरू असताना मुंडे यांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे. त्यामध्ये चर्चा आणि पुढील भूमिका जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.
विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्याचे जाहीर केले होते. यानुसार मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर त्यांनी उपोषणही केले होते. त्या शिवसेनेत जाणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले. अखेर त्यावेळी त्यांचे बंड पेल्यातील वादळ ठरले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App