वृत्तसंस्था
पुणे: औंधमधील प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेच्या छळाला कारणीभूत ठरलेला ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूल याला कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. सुनेचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यामुळे तू आमदार, मंत्री होणार नाही, असा सल्ला देऊन तिच्या छळाला येमूल कारणीभूत ठरल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. spiritual guru Yemul Guruji Is Arrested by pune police for women Persecution
तुझी पत्नी पांढर्या पायगुणाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार व मंत्रीही होणार नाही. त्यामुळे तिला लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा हा तिचेकडून काढून घे. तसेच मी देतो हे लिंबु उतरविल्यानंतर तुझ्या मागची ही पिडा कायमची निघून जाईल, असे गणेश गायकवाडला सांगितले होते. या भविष्यवाणीमुळेच केदार गायकवाडने पत्नीचा छळ केला. तिला सिगारेटचे चटके दिले. मारहाणीत तिला बहिरेपणा आला. छळ करुन त्यांना घराबाहेर काढले होते.
नानासाहेब व त्यांचा मुलगा गणेश ऊर्फ गायकवाड यांच्याविरुद्ध जमिनी बळकावणे, खंडणीचे हिंजवडी, सांगवी ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गणेश गायकवाड याने नुकताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीसपदी नियुक्तीही केली आहे. सध्या गणेश गायकवाड गायब आहे.
कोण आहे रघुनाथ येमूल
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App