विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : भारतातील अमेरिकेच्या राजदूतपदासाठी लॉस एंजिल्सचे महापौर एरिक गार्सेटी (वय ५०) यांचे नाव अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी निश्चि त केले असल्याचे व्हाइट हाउसतर्फे सांगण्यात आले. अमेरिकी संसदेचे वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये त्यांच्या नावाला मंजुरी मिळाल्यानंतर गार्सेटी यांची अधिकृत नियुक्ती होईल.Mayer Garsetti wil be next US ambassador
गार्सेटी हे लॉस एंजिल्सचे ते २०१३ पासून महापौर असून ‘सी ४०’ या शहरांच्या गटाचे ते अध्यक्ष आहेत. जगातील सर्वांत मोठ्या ९७ देशांचा हा गट जागतिक तापमान बदलावर काम करतो. कोरोनाच्या संकटात उपयुक्त साधनसंपत्तीची माहिती सर्वांना देण्यासाठी ‘सी४०’चे नेतृत्व केले होते. त्यांनी भारतात संघटन आणि विस्तारासंबंधीही काम केले आहे.
अमेरिकेचे भारतामधील सध्याचे राजदूत केनेथ जस्टर यांची जागा ते घेतील. अमेरिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेत गार्सेटी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. बायडेन निवडून आल्यावर कॅबिनेट मंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App