विशेष प्रतिनिधी
हॉंगकॉंग : हॉंगकॉंग येथे बंद पडलेले लोकशाही समर्थक वर्तमानपत्र ‘ॲपल डेली’त संपादकीय लेखन करणाऱ्या पत्रकारास रविवारी रात्री विमानतळावर अटक करण्यात आली. ते शहराबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना हॉंगकॉंग पोलिसांनी ताब्यात घेतले.Journalist arrested in Hong Kong
संपादकीय लेखक फंग वाई कॉंग यांना राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी परदेशाशी हातमिळवणी केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी अटक केली आहे.५७ वर्षीय संपादकीय लेखक फंग यांना अटक केली तेव्हा ते ब्रिटनला जाण्याचा प्रयत्न करत होते.
गेल्या दोन आठवड्यात ॲपल डेलीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध अटकसत्र मोहीम राबवण्यात येत असून तुरुंगात जाणारे फंग हे सातवे कर्मचारी आहेत. तसेच ते दुसरे संपादकीय लेखक आहेत.हॉंगकॉंगमधील अधिकारी हे अर्ध स्वायत्त शहरात लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून शहरातील बहुतांशी लोकशाही समर्थक नेत्यांना अटक केली जात आहे.
तसेच लोकप्रतिनिधींचा विरोधी सूर कमी करण्यासाठी हॉंगकॉंगमध्ये निवडणूक कायद्यात सुधारणा केली जात आहे. गेल्या आठवड्यात ॲपल डेलीने शेवटचा अंक छापला. कर्मचाऱ्यांना सुरक्षा तसेच वेतन देण्यास असमर्थ असल्याचे सांगून वर्तमनापत्राचे प्रकाशन बंद करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App