ED च्या दुसऱ्या समन्सनंतरही चौकशीस प्रत्यक्ष हजर राहण्यास अनिल देशमुखांचा नकार; कोरोना, इतर आजार आणि वय ७२ चे दिले कारण

प्रतिनिधी

मुंबई – बार मालकांकडून १०० कोटींच्या हप्ते वसूली प्रकरणात चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED ने काढले. पण बाहेर कोरोनाचा धोका आहे. माझे वय ७२ आहे. मी प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे पत्र अनिल देशमुख यांनी ED च्या चौकशी अधिकाऱ्यांना लिहिले आहे. anil deshmukh refused to appear before ED citing covid, other health issues and due to his age72

या पत्रात देशमुख म्हणतात, की आजही मी स्वत: चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझे वय ७२ वर्षे आहे. इतर आजारपण आणि करोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाइन घ्यावा. ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यास मी कधीही तयार आहे. मात्र, त्याआधी ईसीआर (Enforcement Case Information Report) पाठवावा,’ अशी विनंती देशमुख यांनी केली आहे.



आपल्या वतीने ED ला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नेमला आहे, असेही देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे. आपल्या विरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत, याचा पुनरुच्चारही त्यांनी पत्रातून केला आहे.

बार मालकांकडून हप्ते वसूलीच्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आतापर्यंत दोन वेळा ED ने देशमुख यांच्या घरी छापे घालून कागदपत्रांची तपासणी केली आहे. दुसरा छापा मागील आठवड्यात टाकण्यात आला होता. त्यानंतर देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटकही करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर काही महत्त्वाची माहिती हाती आली आहे. त्या आधारे ED आतापर्यंत अनिल देशमुख यांना चौकशीसाठी दोन वेळा समन्स बजावले आहे.

पहिल्या समन्सच्या वेळी देशमुख यांनी वकिलांना पाठवून मुदत मागून घेतली. त्यानंतर ED ने दुसरे समन्स बजावत देशमुख यांना (२९ जून) आज चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहता येणार नसल्याचे म्हटले आहे.

anil deshmukh refused to appear before ED citing covid, other health issues and due to his age72

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात