गोवा पर्यटकांना अखेर खुले ; मात्र एकच अट लागू !

वृत्तसंस्था

पणजी : गोवा पर्यटनासाठी अखेर खुले केले आहे. मात्र, त्यासाठी एकमेव अट सरकारने घातली आहे. नागरिकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्टचे बंधन घातलेले नाही. ज्या नागरिकांनी कोरोनाविरोधी दोन्ही लशी घेतल्या आहेत, ते गोव्यात पर्यटनासाठी जाऊ शकतात. Goa finally open to tourists; Only One condition applied!

राज्य सचिवालयात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं की, गोव्यात संक्रमण दर ६ टक्के आहे. रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत व त्यांच्याकडे याचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना गोव्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. ही अट पूर्ण केली असेल तर ते पर्यटनासाठी आलेले असो वा व्यवसायाच्यादृष्टीने, त्यांना अडविण्यात येणार नाही.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातील मोठ्या रेल्वे स्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधा वाढवण्यासाठी खासगी लॅबसोबत चर्चा सुरू आहे. शेजारील राज्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिंएट समोर आल्यानंतर सीमा भागांवर अधिक कडक लक्ष दिलं जात आहे. गोव्यात अद्याप एकही डेल्टा प्लस व्हेरिंएटचा रुग्ण आढळला नाही.

Goa finally open to tourists; Only One condition applied!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात