प्रतिनिधी
लोणावळा – ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळाल्याशिवाय महाराष्ट्रात झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी ओबीसी मेळाव्यात केला आहे. If no OBC reservation then no to elections in maharashtra
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशे खर बाबनकुळे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते नाना पटोले आदी मेळाव्याला उपस्थित होते. आतापर्यंत अनेकवेळा निवडणुका पुढे ढकलल्या तशा ह्या देखील ढकलाव्यात, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. ओबीसींच्या हक्कासाठी राजधानीत चक्काजाम करू, न्यायालयात जाऊ…”चक्का जाम तो झाकी है, असली आंदोलन अभी बाकी है” असे काल पंकजा मुंडे यांनी ट्विट केले होते. त्याला सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला.
मराठा – ओबीसींमध्ये वाद निर्माण करून राजकारण करू नका. हे महापाप आहे. भिंती उभी करू नका. सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हे शाहू महाराज, आंबेडकरांनी दिले आहे. हा सामाजिक परिवर्तनाचा लढा, नेतृत्व माझे नाही तुमचे आहे, ही लढाई आपल्याला सर्वांनी मिळून जिंकायची आहे. आम्ही न्याय दिला होता पण सरकार बदलले. या सरकारने वेळ घालवला. डाटा तयार केला नाही. इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम सरकारचे त्यांनी ते करावे.” असे देखील पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
ओबीसी परिषदेत मांडलेले राजकीय ठराव
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App