उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारची एक योजना ग्रामीण महिलांसाठी गेमचेंजर ठरत आहे. ग्रामीण भागातील महिलांना ‘बँक सखी’ म्हणून नियुक्त केलं जातं आणि या महिला गावकऱ्यांच्या बँकांशी निगडीत सर्व समस्या निवारण करण्याचे काम करत आहेत.Women empowerment of Yogi government in Uttar Pradesh, women are earning Rs 40,000 per month by becoming bank sakhi
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारची एक योजना ग्रामीण महिलांसाठी गेमचेंजर ठरत आहे. ग्रामीण भागातील महिलांना ‘बँक सखी’ म्हणून नियुक्त केलं जातं आणि या महिला गावकऱ्यांच्या बँकांशी निगडीत सर्व समस्या निवारण करण्याचे काम करत आहेत.
ज्या व्यक्ती बँकेत जाऊ शकत नाहीत किंवा बँक त्यांच्या राहत्या घरापासून खूप दूर आहे अशा लोकांना मदत करण्याचं काम या ‘बँक सखी’ करतात. उत्तर प्रदेशात ‘बँक सखी’ योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘बँक सखी’ म्हणून नियुक्त केल्या जाणाºया महिलांना पहिले सहा महिने दरमहा ४ जार रुपयांचं मानधन दिले गेले. त्यासोबतच लॅपटॉप खरेदीसाठी सराकारकडून ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.
लॅपटॉपमुळे बँकांची कामं बँक सखींना गावाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आणि ग्राहकांच्या अगदी घरी जाऊन करता येऊ लागली. ‘बँक सखी’ नियुक्त ग्रामीण महिलांचंही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले बँक सखी’ म्हणून काम करत असणाऱ्या ज्योती म्हणाल्या, बँक सखी’मुळे पूर्णपणे स्वावलंबी होण्यास मदत झाली.
कुटुंबीयांची आर्थिक गरज पूर्ण झाली. एमए केल्यानंतर एलएलबीचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. कोरोना महामारीच्या काळात देखील गावागावात जाऊन एक कोटींपेक्षाही अधिक रुपयांचं ट्रान्झाक्शन केल्याचं ज्योती सांगतात.
‘बँक सखी’च्या माध्यमातून काही ठराविक मानधन मिळत नसलं तरी प्रत्येक ट्रान्झाक्शनवर कमीशन स्वरुपात खूप चांगले पैसे मिळतात. दरमहा जवळपास ४० हजार रुपयांची कमाई मी करते, असे ज्योती सांगतात.
‘बँक सखी’ पदावर काम करण्यासाठी त्यांनी बँकेकडून ट्रेनिंग घेतलं आहे आणि त्यानंतर लॅपटॉप घेऊन त्यांनी गावातूनच काम करण्यास सुरुवात केली. बँकेत जाणं ज्यांना शक्य होत नाही किंवा बँक खूप दूर आहे. अशा बँकेच्या ग्राहकांना बँकिंग संदभार्तील कामांसाठी ज्योती त्यांना मदत करतात. यात बँकेतून पैसे काढणं, पैसे भरणं अशा सुविधांचा देखील समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App