Jayant Patil : अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयच्या माध्यमातून छापा टाकण्यात आला त्यात काही आढळलं नाही,आता ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जाते आहे,महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काही तरी तक्रारीवर बोट ठेऊन त्रास दिला जातो आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. ते लातुर इथं माध्यमांशी बोलत होते. हेमंत करकरे यांच्या बद्दल महाराष्ट्र अभिमान बाळगतो, ते शहिद आहेत, त्यांच्या बद्दल साध्वी प्रज्ञा सिंह यांनी चुकीचे विधान करून लोकांच्या भावना दुखवल्या आहेत,असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे,साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांनी शिक्षकाची बोटे छाटली होती असे विधान केले होते त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लातुरला रेल्वेने पाणी येऊ शकते तर पाईपलाईन द्वारे का नाही, असा सवाल करीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातून लातुरला पाणी देण्या संबंधी मागणी होते आहे,त्यावर लवादा सोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल,दोन खोऱ्यामधून लातुरला पाणी द्यावे अशी लातुरच्या लोकांची आणि नेत्यांची मागणी असल्याचं त्यांनी सांगितले आहे. WATCH NCP State President Jayant Patil Comment On ED Raid On Anil Deshmukh
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App