वृत्तसंस्था
सिंगापूर : कोरोना महामारीला सर्वोत्तम प्रकारे हाताळणाऱ्या सिंगापूरनं कोरोनाशी लढण्यासाठी लवकरच दैनंदिन जीवनात मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. Singapore New Normal Country not release Covid Data no need for Quarantine new plan to live with virus
एखाद्या तापाच्या साथीला तोंड दिलं जाते. त्या पद्धतीनं कोरोना प्रादुर्भावाकडे लक्ष दिलं जाणार आहे. देशासमोर आता ‘झिरो ट्रान्समिशन’ हे लक्ष्य असणार नाही. प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येणार नाही आणि बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्याही आयसोलेट करण्यात येणार नाही, अशी घोषणा सिंगापूरनं केली आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहिर करण्यात येणार नाही.मात्र, दुकानांत किंवा कार्यालयात जाण्यासाठी चाचणी करण्याचा नियम कायम राहणार आहे. कोरोना सोबत जगण्याची तयारी करायला हवी आणि हे नुसतं बोलून नव्हे, तर कृतीत आणण्याची गरज आहे, असं सिंगापूरच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितलं.
सिंगापूरचे वाणिज्यमंत्री गान किम योंग, अर्थमंत्री लॉरेंस वोंग आणि आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी या आठवड्यात स्ट्रेट्स टाइम्समध्ये एक संपादकीय लेख लिहिला होता. यात कोरोना या जगातून कधीच जाणार नाही, ही वाईट बातमी आहे आणि चांगली बातमी अशी की या विषाणूसोबतच जगण्याची पद्धत आपण अंमलात आणू शकतो, असं म्हटलं होतं.
सिंगापूरमध्ये दररोज २० ते ३० नवे रुग्ण
सिंगापूरमध्येही गेल्या वर्षी कोरोनाचं प्रमाण प्रचंड होतं. एप्रिलच्या मध्यापर्यंत देशात दररोज ६०० रुग्णांची वाढ होत होती. ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रभाव दिसला नाही. दरम्यान, केवळ ५७ लाख लोकसंख्या असेलल्या सिंगापूरमध्ये दररोज २० ते ३० नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत.आतापर्यंत देशात ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. इतर देशांप्रमाणेच सिंगापूरमध्येही निर्बंध लागू आहेत. यात देशात दाखल होताच कोरोना चाचणी, हॉटेल क्वारंटाइन आणि होम आयसोलेशन अशा नियमांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App